political

सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरूच.

दिपकआबांच्या उपस्थितीत अक्षय महामुनीसह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.

सांगोला ; तालुका प्रतिनिधी

सांगोला शहरातील सामाजिक कार्यकर्ते, सोनार समाज (अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र) अध्यक्ष (मातोश्री प्रतिष्ठान) सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष, उद्योगपती अक्षय भैय्या महामुनी यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला.
हर्षदा लॉन्स येथे ७ ऑगस्ट सोमवार रोजी हा जाहीर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, शिवाजी नाना बनकर, युवक तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे, माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत, शहराध्यक्ष रवीदादा चौगुले, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कार्यालयापासून मोटार सायकल व चार चाकी वाहनांची भव्य रॅली हर्षदा लॉन्स काढण्यात आली.
यावेळी महामुनी यांच्या मित्र परिवाराच्या वतीने मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.

    सत्कार संपन्न झाल्यानंतर व्यासपीठावरून बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना विशेषता तरुणांना विविध प्रलोभने आणि आश्वासने दिले जात आहेत तरी, अशा खोट्या आश्वासनाला बळी न पडता माझ्यावर व माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अक्षय महामुनी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याबद्दल मी त्यांचे कौतुक व आभार व्यक्त करतो त्यांचे पक्षात स्वागत करत आहे तसेच माझा पक्ष व व्यासपीठावरील उपस्थित असणारे मंडळी हे एक कुटुंबच आहे या कुटुंबातील सदस्य अक्षय महामुनी व त्यांचे कार्यकर्ते झाल्याने यापुढे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात आपण हक्काने सहभागी होऊ असे यावेळी आबांनी सांगितले त्यानंतर महामुनी यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश दिपकआबांच्या हस्ते घेण्यात आले.
   या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमा वेळी सोनार समाजाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई कस्तुरे, शिवाजीनाना बनकर, ॲड. महादेव कांबळे, गिरीश पाटील सर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सूत्रसंचालन प्रा. मनोज उकळे सर यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय महामुनी यांनी केले.
    या पक्षप्रवेश कार्यक्रमाला मिनाज खतीब, सौ.रेखा भोसले, निसार शेख, नितीन काटे, अमिन शेख, अनिल सावंत, गजेंद्र गेजगे, अब्बास मुलाणी,गीतांजली महामुनी, प्राची महामुनी, प्रगती महामुनी,बाळासाहेब पंडित, सिताराम पंडित, अशोक पंडित, प्रसाद पंडित, सिताराम वेदपाठक, शशिकांत वेदपाठक ,गजेंद्र गेजगे, अभिजीत गेजगे, कृष्णा गेजगे, प्रतीक भोसले,शंकर गेजगे,अंकुश गेजगे,सागर शिनगारे, विनोद शिनगारे, कुमार शिंनगारे, बंडू गडदे ,समाधान मिसाळ आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 दिपकआबांचे खंबीर नेतृत्व तालुक्याला दिशा देऊ शकते..!

सध्या सांगोला तालुक्यात अनेक नेत्यांचे पेव फुटले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक नेते “रात्र थोडी आणि सोंगे फार” करू लागले आहेत. परंतु, सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या शिवाय आज तालुक्याला पर्याय उरला नाही. त्यामुळे त्यांनी या तालुक्याचे नेतृत्व करावे आम्ही सर्व तरुण खंबीरपणे आबांच्या पाठीशी उभे राहू.

मा. अक्षयभैय्या महामुनी.
युवा नेते, सांगोला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!