
सांगोला/ तालुका प्रतिनिधी
बंद फ्लॅटमध्ये चोरट्यांनी प्रवेश करुन ७० हजार रुपये लंपास केली असल्याची घटना लंबोदर अपार्टमेंट, कडलास रोड, सांगोला येथे घडली. चोरीची फिर्याद नितिन साळुंखे (रा.जवळा ता.सांगोला, सध्या रा.लंबोदर अपार्टमेंट, कडलास रोड, सांगोला) यांनी सांगोला पोलीसांना दिली आहे.
याबाबत सांगोला पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती फिर्यादी हे एचडीएफसी बॅक शाखा सांगोला येथे नोकरीस असल्याने लंबोदर अपार्टमेंट, कडलास रोड, सांगोला येथे फ्लॅट भाड्याने घेवुन राहणेस आहे. फिर्यादी यांची पत्नी शिवाणी, आई पुष्पा, वडील बबनराव व मुले असे मुळ गावी जवळा येथे राहणेस आहेत.फिर्यादी यांना २८ सप्टेंबर २०२४ व २९ सप्टेंबर रोजी शनिवार व रविवार सुट्टी असल्याने दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता जवळा येथे गेले होते. फिर्यादी यांनी रोजच्या वापराचे व भाऊजी ज्ञानेश्वर बोरगे यांचे वडील मयत झाले असल्याने त्यांचे कामाकरिता लागणारे पैसे रोख रक्कम ७० हजार रुपये ठेवलेले होते. त्यानंतर फिर्यादी हे दि.३० सप्टेंबर २०२४ रोजी बँकेत कामावर आले होते. काम झाल्यानंतर फ्लॅटवरती जाऊन सायंकाळी ७ वाजता जवळा येथे गेले. त्यानंतर दि.०१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राहत असलेल्या फ्लॅटचे मालक निता बोरगे यांनी फोन करुन फ्लॅटचा दरवाजा उघडा असुन बहुतेक चोरी झाली आहे, असे सांगीतले. त्यानंतर फिर्यादी यांनी जवळा येथुन सांगोला येथील फ्लॅटवरती आले असता ठेवलेली रोख रक्कम ७० हजार रुपये मिळुन न आल्याने चोरी झाल्याची फिर्यादीत नोंद करण्यात आल्याची माहिती सांगोला पोलिसांकडून मिळाली आहे.