कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात सोलापूर ग्रामीणची नेत्रदिपक कामगिरी.

सोलापूर / प्रतिनिधी
दिनांक १६.१०.२०२४ ते १८.१०.२०२४ या कालावधीत कोल्हापूर परिक्षेत्रीय १९ वा पोलीस कर्तव्य मेळावा – २०२४ हा पार पडला आहे. सदर मेळाव्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यातील संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस घटकाकडून कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली एकूण १८ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी भाग घेतला. यामध्ये पोलीस तपास, संगणकाचे अधुनिक तंत्रज्ञान, पोलीस विभागाकडील प्रशिक्षीत श्वानाचे कौशल्य व त्याबाबत पोलीसांना असणारे ज्ञान याबाबत स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. सदर स्पर्धेचा निकाल दिनांक १८.१०.२०२४ रोजी जाहीर झाला असून विजेत्यांना मा.सुनिल फुलारी, (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र) यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीण घटकाने प्राप्त केलेले यश पुढील प्रमाणे.
स्पर्धेचा प्रकार व विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे:-
Scientific Aids to Investigation /Labeling and packing Test रौप्य पदक अधिकारी व अंमलदार पोलीस निरीक्षक.रणजीत माने (नियंत्रण कक्ष)
Medico-Legal Oral-कास्य पदक-पोलीस निरीक्षक रणजीत माने, (नियंत्रण कक्ष)
Police Portrait Test-सुवर्ण पदक
पो.शि. आशुतोष कुलकर्णी,
Police Photography-रौप्य पदक पो.ह/ जयवंत सादूल, Anti-sabotage Check/
Access Control-रौप्य पदक पो.ना/ रोहीत टोणपे,
Access Control-कास्य पदक
पो.कॉ. वामन यलमार,
Computer Awareness
Objective Test-सुवर्ण पदक- पो.काँ / प्रसाद मांढरे,
MS office-कास्य पदक पो.कॉ/ प्रसाद मांढरे, V.B.Net-सुवर्ण पदक;पो.कॉ/ प्रसाद मांढरे,पो.कॉ.बाळकृष्ण मुठाळ, पो.ह. शिवानंद सौदगरे, पो.कॉ.एकनाथ छत्रे
Dog Squad Competition:- Tracking सुवर्ण पदक श्वान – जिमी
Explosive:-सुवर्ण पदक श्वान – टेरी
पो.ह/ सिध्दलिंग स्वामी, पो.ह/चिदानंद रायकोटी.
सदरची कामगिरी कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक मा.श्री. अतुल कुलकर्णी, प्रितम यावलकर,(अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), मा. श्रीमती विजयलक्ष्मी कुरी( पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) सोलापूर ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर यांच्याकडून मिळाली आहे.