crime
सांगोला- कडलास रोडवरील अपघातात अज्ञात इसमाचा मृत्यू

सांगोला / प्रतिनिधी
अपघातात जखमी होवुन उपचारापुर्वीच अज्ञात इसमाचा मृत्यू झाला असल्याची घटना दि.२९ ऑक्टोबर रोजी २ वाजण्याच्या सुमारास सांगोला ते कडलास रोडवरील पॉलीटेक्निक कॉलेज समोर घडली. याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉॅ.साळुंखे यांनी सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून पुढील तपास पो.ना. जाधव हे करीत असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.