crime

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी.

२९ तलवारी व ३ कोयत्यांचा अवैध शस्त्रसाठा जप्त, ३ आरोपींना अटक.

सोलापूर/ प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची निवडणूक प्रक्रिया सुरू असून दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सदरची मतदान प्रक्रिया शांततेत, भयमुक्त व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी जिल्ह्यात प्रभावी प्रतिबंधक कारवाई, अवैध शस्त्र जप्ती, नाकाबंदी व अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण)यांनी जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणेस सुचीत केले आहे.
त्यावरून सुरेश निंबाळकर (पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा) सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून जिल्ह्यातील अवैध शस्त्र असणारे भागात बातमीदार नेमून असे शस्त्र जप्त करणेबाबत मार्गदर्शन केले होते. त्यावरून स.पो.नि विजय शिंदे व त्यांचे पथक अक्कलकोट भागात पेट्रोलिंग करत असताना पो.ह. रवि माने यांना (मौजे जेऊर.ता. अककलकोट) येथील बबलिंग पंचाक्षरी बमगोडा याचेकडे मोठ्या प्रमाणात अवैध तलवारीचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरून बबलिंग बमगोंडा यांच्या घराची झडती घेतली असता त्याचेकडे ३० ते ३५ इंच लांबीचे पाते असणारे एकूण २० तलवारी मिळून आले. त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने त्याचे दोन साथीदार नामे लक्ष्मीकांत काशिनाथ कोळी (रा. चिंचपूर, ता. अक्कलकोट) व सुनिल बसप्पा कुंभार (रा. तडवळ, ता. अक्कलकोट) यांचेकडे देखील अवैध तलवारी असल्याची माहिती दिली. त्यावरून स.पो.नि विजय शिंदे व पथकाने त्यांच्या अधिक तपास करून लक्ष्मीकांत कोळी याचेकडून ३० ते ३५ इंच लांबीच्या ५ तलवारी व २ कोयते मिळून आले आहेत. तर कुंभार याचेकडे घरझडती मध्ये ३० ते ३५ इंच लांबीच्या ४ तलवारी व १ कोयता मिळून आला आहे. अशा प्रकारे २९ तलवारी व ३ कोयते ही अवैध असल्याचे निष्पन्न झाल्याने उपरोक्त तिन्ही इसमांविरूध्द पोह रवी सुनिल माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकोट दक्षीण पोलीस ठाणेस (भारतीय हत्यार कायदाचे कलम ४/२५ प्रमाणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपरोक्त तिन्ही आरोपींना पुढील तपासकामी अक्कलकोट दक्षीण पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), प्रितम यावलकर, (अप्पर पोलीस अधीक्षक), सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर (पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.) यांचेसह स.पो.नि विजय शिंदे, (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक) श्रीकांत गायकवाड, (पो.ह. रवी माने), सलीम बागवान, पल्लवी इंगळे, पो.कों सुरज रामगुडे, विनायक घोरपडे, मनोज राठोड सतिश बुरकुल सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!