सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी ८ अर्ज अवैध, ३२ उमेदवारांचे ४० अर्ज वैध.

सांगोला / प्रतिनिधी
सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जाची काल ३० बुधवार रोजी छाननी करण्यात आली. या छाननीत सौ. रेखा शहाजी पाटील (शिवसेना), कुंदन फुलचंद बनसोडे (बसपा), तानाजी शिवाजी केदार (अपक्ष), दिगंबर शंकर लवटे (अपक्ष), तुकाराम केशव शेंडगे (राष्ट्रीय समाज पक्ष) या पाच उमेदवारांचे अर्ज पूर्णतः अवैध ठरवण्यात आले आहेत. तसेच तीन उमेदवारांनी दोन अर्ज भरले होते त्यापैकी एक अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी दिली आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी ३८ उमेदवारांनी ४८ अर्ज दाखल केले होते तसेच तीन उमेदवारांनी दोन अर्ज भरले होते त्यापैकी एक अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. तसेच ३२ उमेदवारांचे ४० अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत अशी माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली आहे.