उद्या सांगोला विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांचा उमेदवारी भरणार:-दादासाहेब लवटे.
मोटरसायकल रॅली व सभेचे आयोजन.

सांगोला/ प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड. शहाजीबापू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवार दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोटर सायकल रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी दिली आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ॲड. शहाजीबापू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोटरसायकल रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीची सुरुवात एखतपुर रोड ब्रिज पासून सुरुवात होऊन नेहरू चौक येथे रॅली ची सांगता होणार आहे. रॅली संपल्यानंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सदर मोटरसायकल रॅलीसाठी व सभेसाठी सांगोला शहर व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे.